भीषण आग: कंटेनरच्या केबीनमध्ये स्वयंपाक करताना आग; कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने भडका, 40 फ्रीज खाक

Spread the love

जळगाव : – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरला शनिवारी सायंकाळी 5 वाजता आग लागली. या आगीत सुमारे 40 फ्रीज जळून खाक झाले आहे. कंटेनरचा चालक केबीनमध्ये स्वयंपाक करत असताना ही आग लागली. फ्रीजमध्ये असलेल्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.

जळगाव शहरातील एस. के. ट्रान्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कंटेनर (एमएच १९ सीवाय २५११) ७० नवीन फ्रीज घेऊन रेल्वे स्टेशन परिसरात उभा होता. हे फ्रिज रेल्वेने गुजरात येथे पाठविण्यात येणार होते.

यासाठी सामान काढण्याचे काम सुरु होते. कंटेनरचा चालक हा कॅबिनमध्ये स्वयंपाक बनवीत असतानाच अचानक आग लागल्याने धुर निघण्यास ‘सुरवात झाली. नवीन फ्रीज असल्याने त्यातील कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन काही क्षणात आग मोठ्या प्रमाणावर पसरली. दरम्यान आग लागताच चालक पसार झाला झाला. नागरिकांनी धाव घेत काही सामान बाहेर काढण्यास मदत केली. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशनचे तीन बंब दाखल झाले झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

दरम्यान, संबधित ट्रान्सपोर्ट कंपनीचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दिड तासानंतर आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवता आले. आगीत सुमारे ४० फ्रीज जळुन खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

टीम झुंजार