
शिरपूर :- सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच शिरपूर-चोपडा रस्त्यावर तरडी गावाजवळ शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ट्रक व टाटा ४०७ समोरासमोर धडकली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील चालक व सहचालकाचा मृत्यू झाला. मृत अकोला येथून शिरपूरला कपाशीचे बियाणे वितरित करण्यासाठी आले होते. त्यानंतर ते चोपडा येथे जात असताना हा अपघात झाला. अकोला येथून येत शिरपूर येथे कापसाचे बियाणे वितरित केल्यावर चोपडा येथे टाटा ४०७ (क्र : एमएच-४३-एफ-०८४२ ) जात होती.
या वाहनाला शिरपूर ते चोपडा रस्त्यावर तरडी जवळ शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र : आरजे-४०-जेए-४८२२) समोरून ज धडक दिली.
या अपघातात ४०७ मधील चालक व सहचालकाचा मृत्यू झाला. अब्दुल सगीर शेख जमीर (वय २०), अब्दुल फारुक गुलाम मतीन (वय २१ मु. पो. बाळापूर, जि. अकोला) असे मृतांचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. नागरिकांनी मृतांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले.





