जळगाव, दिनांक २९ (प्रतिनिधी ) : सध्या जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातावर शिवबंधन बांधत असून यात जळगावसह धरणगाव तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेणार्यांचे स्वागत करण्यात आले.
जळगाव तालुक्यातील भोकर आणि धरणगाव येथे शनिवारी शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यात प्रामुख्याने भोकर येथे जळगाव महापालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक राजेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ना. गुलाबराव पाटील हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर सायंकाळी धरणगाव येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील माजी सरपंच लीलाधर पाटील, माजी उपसरपंच दिलीप पाटील, कामगार संघटनेचे सुरेश माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील तसेच गावातील सक्रिय कार्यकर्ते किरण पाटील, गणेश पाटील, विशाल पाटील, मयूर पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील, ईश्वर पाटील, अधिकार पाटील , रवींद्र पाटील व प्रवीण पाटील यांच्यासह अनेकांनी शिवबंधन बांधले.
ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून या सर्वांनी शिवसेनेच्या विचारांचा आणि राज्य सरकारच्या सुशासनाचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीआधी पक्षात झालेले इनकमींग महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, उपनेते लक्ष्मणराव वडले, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, प्रशांत पाचपुते, संतोष चांदे, संकेत बने, शांताराम बने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, पवन सोनवणे आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.