सकाळी उठल्यानंतर खाल्ल्याने एनर्जी होते बूस्ट; ताणतणाव दूर ठेवत आरोग्य निरोगी ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Spread the love

आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. बाहेर काम करतानाही त्यांनी घरातील कामांकडे पाठ फिरवली नाही. घर आणि ऑफिस या दोन्ही ठिकाणी दिवसभर काम करणाऱ्या महिलांचे मात्र आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांनी सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासात काही खाल्यास एनर्जी बूस्ट होईल व आरोग्यही निरोगी राहील. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट आवश्यक आहे.

एकीकडे गृहिणी आपल्या घर व मुलांच्या जबाबदारीत इतक्या व्यग्र झाल्या आहे की त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठीही वेळ नाही तर दुसरीकडे नोकरदार महिला घरातील जबाबदाऱ्या व ऑफिसच्या कामात आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर न खाणे, पुरेशी झोप न घेणे, कामाचा ताण घेणे यामुळे या समस्या निर्माण झाल्या. त्यासाठी महिलांमध्ये एनर्जी असणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टीम झुंजार