प्रत्येकाने सहकुटुंब बघावा असा चित्रपट म्हणजे “धर्मवीर”..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी।धरणगाव
सच्चा राजकारणी, लोकसेवक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व. आनंद दिघे साहेब. आपल्या आनंद आश्रमातून जनतेसाठी, गोर गरिबांसाठी प्रति न्यायालय चालविणारे दिघे साहेब किती ग्रेट होते, हे आजच्या तथाकथित लोकसेवक राजकारण्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, किंवा कायद्याच्या चौकटी मोडून “जनसेवा” हाच धर्म मानणारे दिघे साहेब म्हणजे खरंच दैवी शक्ती असणारे महापुरुष होते असं म्हणता येईल.

जळगाव जिल्ह्यात शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, यांच्या तर्फे पुरुष व महिलांसाठी धर्मवीर हा चित्रपट शो मोफत ठेवण्यात आला .
मी धर्मवीर चित्रपट पाहात असताना एक एक दिघे साहेबांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा मिळत गेला व समोर खरोखरच दिघे साहेबच उभे आहेत असा भास निर्माण झाला त्यातील काही आठवणींना उजाळा मिळत गेला, मला शिवसेना भवनातील बैठकीचा प्रसंग या निमित्ताने आठवला म्हणून सांगतो,दिघे साहेब ठाणे जिल्हा प्रमुख आणि त्यावेळी मी तालुका प्रमुख म्हणून बैठकीला उपस्थित होतो,१९९० ला पुर्णपणे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक शिवसेना लढणार असे बाळासाहेबांनी सांगितले,

तेव्हा साहेबांनी सांगितले की ठाण्या मधुन आंनद तुला लढायचं आहे, तेव्हा दिघे साहेबांनी सांगितले की साहेब तुमचा शब्द आणि जागा खाली हा आंनद खाली जावु देणार नाही,पण मी लढणार नाही? साहेबानी विचारले का? तेव्हा दिघे साहेबांनी जे उत्तर दिले ते मनाला माझ्या सकट सर्वांना भावुन गेले, साहेब मी तुमचा शिलेदार आहे , तुमचा सारख होता येणार नाही पण तुमचा एक गुण तरी मी घेतला पाहिजे, जसं आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसं मी हि कोणतीही निवडणूक लढवणार नाही,पण सर्व निवडणुकीत तुम्हाला विजय मिळवून दाखवु असे बाळासाहेबांना वचन दिले त्याचा मला साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले,त्यावेळस पहिला खासदार म्हणून कै. प्रकाश परांजपे ठाणे तुन निवडुन आले.

आजची तशीचशिवसेना उभी आहे, तसेच वाडा मोखाडा या आदिवासी पट्ट्यात गणपती चा आरती आटोपून परत असतांना त्यांच्या त्या वेळच्या अरमाडा (महेंद्र कंपनी) गाडी चा अपघात झाला आणि दिघे साहेबांची गाडी पलटी झाली, मोठ्या हास्पिटला अडमिठ केले,शर्तीचे प्रयत्न केले पण साहेब वाचु शकले नाही, रात्री ९ते१०दरम्यान हि बातमी वा-या सारखी पुर्ण महाराष्ट्रात पसरली आणि धरणगाव येथे गणपती निमित्ताने गितगायन स्पर्धेचा कार्यक्रम सांने पटांगणावर चालू होता, कार्यक्रम बंद करून, धरणगाव चा शिवसैनिकांना घेऊन ठाण्याचा दिशेने निघालो, सकाळी ठाणे पाहिले स्तब्ध झाले होते,माय माउली, जनता, यांच्या केलेला कामांचा अश्रुंच्या बांध वाहत होता, अशा धर्मवीराचा अंत्यविधीला उपस्थित राहता आले हे हि माझे भाग्य समजतो.ठाणे महापालिका परीवहन सेवेत (टि एम टी) माझ्या विनंती वरून ८ते १० कार्यकर्ते नोकरी ला लावले,ते आज हि नोकरी करीत आहे.आज या कुटुंबातील सर्व परीवार वेल सेटल आहेत, असे हजारो कुटुंबे असतील ते आजही दिघे साहेबांना अभिवादन करत असतील.मी हे प्रत्यक्षात अनुभवले आहे. माझा सकट जे जे शिवसैनिक संम्पर्कात आले असतील त्यांच्या त्यांच्या आठवनीनां धर्मवीर सिनेमा पाहिल्यानंतर उजळा मिळाल्याशिवाय राहिल्या नसतील.
शिवसेना वाढीसाठी आदिवासी पाड्यांवर मोटारसायकल वरती फिरून शिवसेनेचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाला खरंच मनापासून सलाम ????.

.!! दिघे साहेबांचा परीस स्पर्श झालेले, त्यांनी घडविलेले अतिशय नम्र आणी यशस्वी राजकारणी म्हणून आपण एक रिक्षाचालक ,माजी वाडाचे (ठाण्यातील एक ऐरीया)शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, शिवसेना नेता,आता महत्वाचे खाते असलेले नगरविकास मंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना आज बघू शकतो. शिंदे आज हि सेवा मानुन दिघे साहेबांचा जनसेवेचा वसा अविरतपणे चालवत आहे, ठाणे शहर जिल्ह्यातील जनता हेच कुटुंब मानून काम करत आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा एक एक शिवसैनिक किती मोलाचा आहे हे आपण या चित्रपटातून अनुभवू शकतो.

प्रसाद ओक आणी प्रवीणजी तरडे यांच शिवसेना पक्षप्रमुख तसेच भारतात टाॅप 5 (फाईव्ह )मधे आलेले लोकप्रिय मुख्यमंत्री मा . उद्धव साहेब ठाकरे यांनी सिनेमा चे ट्रिझर चा वेळेस मनापासून कौतुक केले. या चित्रपटाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे हे मात्र निश्चित असे हि म्हणाले आहेत..
नम्र विनंती ????,कि प्रत्येक नागरिक तसेच शिवसैनिकांनी हा सिनेमा परीवारासह पाहवा.असे आव्हान गुलाबराव वाघ शिवसेना सहसंपर्क प्रमुख जळगाव यांनी केले आहे

  गुलाबराव वाघ

टीम झुंजार