पळासखेडेसिम विकासोवर शिवसेनेचा भगवा १२ पैकी ११ जागेवर शिवसेना विजयी

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा –
तालुक्यातील पळासखेडेसिम विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी २० मे रोजी निवडणुक प्रक्रीया घेण्यात आली. या १२ जागेंच्या लढतीत १२ पैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवत पळासखेडेसिम विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे.

यासमयी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन डी.बी.बारी यांनी कामकाज पाहिले. यात चेअरमन परशुराम तंगा पाटील, व्हा.चेअरमन मंगलाबाई दिनकर पाटील, अरूण दामु पाटील, प्रविण दयाराम पाटील, संजय उत्तम पाटील, अशोक मुलचंद पाटील, गुलाब भाऊराव पाटील, भारत दगडु पाटील, अमृत शांताराम पाटील, आप्रुकबाई चिंतामण पाटील व तानकु दिलभर भिल यांनी विजय संपादन केला.

या सर्व विजयी उमेदवारांचा आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच विनोद परशुराम पाटील, उपसरपंच भारत रामदास पाटील, हिरालाल गंगाराम पाटील, संजय गंभीर पाटील, शांताराम नथ्थु पाटील, दिनकर चिंधा पाटील, चिंतामण बाबुलाल पाटील, नाना तंगा पाटील, सचिव देविदास काशिनाथ पाटील, रामकृष्ण मन्सुर पाटील, कैलास हिम्मतराव पाटील व भगवान झावरु पाटील यांचेसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

टीम झुंजार