गुणवंत आणि विचारवंत यांच्यामुळे समाजाची विकासाकडे वाटचाल होते.-पालकमंत्री गुलाबराव पाटील. फरकांडे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल- गुणवंत आणि विचारवंत यांच्यामुळे समाजाची विकासाकडे वेगाने वाटचाल होत असते असे प्रतिपादन जिल्ह्याचे पाल्मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.फरकांडे येथे ग्रामपंचायत आणि जन्मभूमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विविध क्षेत्रात यश प्राप्त करणा-या मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.आमदार चिमणराव पाटील अध्यक्षस्थानी होते.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,कासोद्याचे सरपंच महेश पांडे,जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मत पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील प्रमुख पाहुणे होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षण घेवून आणि परिश्रम केल्यास यश निच्छित मिळत असल्याचे सांगितले.गुणवंत आणि विचारवंत हि विकासाच्या गाडीची दोन चाके असून त्यांच्यामुळे समाजाची विकासाकडे वेगाने वाटचाल होत असल्याचे सांगितले.गुणवंत व्यक्तींचा सत्कार केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून ईतरांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.राज्य व शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी यश प्राप्त करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार चिमणराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत मनात असलेली भीती दूर करून आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात असे आवाहन केले.ध्येय निच्छित करून योग्य नियोजन केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असल्याचे सांगितले.जन्मभूमी फाऊंडेशन आणि ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणा-या मान्यवरांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी शामराव पाटील,एम.पी.एस.सी.परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले अनिकेत पाटील,पीएचडी प्राप्त करणारे डॉ.तुषार वडगावकर,वसंत पाटील,सुरेश पाटील,दिलीप पाटील,धर्मराज पाटील,हैबतराव पाटील,समाधान पाटील,पांडुरंग चौधरी,ह.भ.प.दिनेश महाराज यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.जन्मभूमी फाऊंडेशनचे संस्थापक साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास माजी सरपंच सुदाम पाटील,डॉ.डी.आर.पाटील,ग्रामपंचायत सदस्य नरेश ठाकरे,वनकोठ्याचे सरपंच उमेश पाटील,मराठा महासंघाचे यूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ललित पाटील,अभिषेक पाटील,डॉ.बी.बी.भोसले.बापू पाटील,डॉ.संजय बच्छाव,सरपंच निर्मलाबाई पाटील,माजी सरपंच रोहिदास पाटील यांचेसह प्ग्रामास्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी उपसरपंच शरद पाठक,गजानन पाटील,रवींद्र पाटील,संजय पाटील,राकेश पातील्सुभाश पाटील,रामू गढरी,अनिल मोरे,करण बेहरे,ग्रामसेवक सुभाष देवराज,राकेश पाटील,गणेश पाटील यांनी सहकार्य केले.

फोटो ओळी-फरकांडे (ता.एरंडोल) येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांचेसोबत आमदार चिमणराव पाटील,जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने व पदाधिकारी.

टीम झुंजार