
पिंपरी-चिंचवड ( पुणे ) :- सध्या हॉरर चित्रपट पाहण्याची सवय लहाण मुलांना होत आहे चित्रपट पाहुनच त्याने असे केले असेल असं पोलिसांना वाटते पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षांच्या मुलाने खेळण्यातील बाहुलीला फाशी दिली. बाहुलीला फाशी देण्याआधी त्याने तिच्या तोंडाला कपडा बांधला. यानंतर स्वत:च्या तोंडाला कपडा बांधून लटकवून घेतलं. थेरगावमध्ये हा प्रकार समोर आला आहे.
संबंधित कुटुंबीय नेपाळी असून ते एका सोसायटीतील पार्किंगमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुलं असून आठ वर्षांचा मुलगा सर्वात मोठा आहे. वडील याच सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.
मोबाईलमधील व्हिडीओ पाहून मुलाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. ही घटना घडली त्या वेळी मुलाची आई घरातच होती. दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
बराच वेळ आवाज येत नसल्याने आईने खिडकीकडे पाहिलं आणि…
संबंधित आठ वर्षांचा मुलगा घरात बाहुलीसोबत खेळत होता.त्याची आई कामात व्यग्र होती. मुलगा खेळत असल्यामुळए आईने कामं उरकून घेण्याला प्राधान्य दिलं. मात्र बराच वेळ आवाज येत नसल्याने आईने लक्ष्य दिलं. मुलाकडे पाहिल्यानंतर भूषण (बदललेलं नाव) खिडकीला लटकलेला होता. आणि बाहुलीला टॉवेलने लटकवलं होतं. मुलाने घरातील कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळफास घेतला.
मोबाईल व्हिडीओचं वेड
पुण्यात दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भूषण मोबाईवर व्हिडीओ बघत होता. त्याला हॉरर चित्रपट पाहण्याची सवय असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्यातून खेळत असताना त्याने बाहुलीला फाशी दिली. पोलीस पंचनाम्यासाठी आल्यानंतर त्यांना बाहुलीच्या तोंडावर फडका बांधल्याचं दिसलं. तसेच टॉवेलच्या सहाय्याने या बाहुलीला फाशी देण्यात आली होती.





