बालिका दिन व अपूर्व विज्ञान मेळावा साजरा.

Spread the love

40गाव प्रतिनिधि नेहा राजपुत :-दि. 3 जानेवारी हा बालिका दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. रवींद्र दयाराम निकम हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवनेरी फाउंडेशन चाळीसगाव च्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण या लाभल्या.सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय अपूर्व विज्ञान मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.प्रतिभा ताई मंगेश चव्हाण यांनी केले.या अपूर्व विज्ञान मेळाव्यात शाळेतील 83 विद्यार्थ्यांनी आपले विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले.त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी स्वागत गीत सादर करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.शाळेतील नववीची विद्यार्थिनी कु. सायली समाधान पाटील हिने ‘ मी सावित्री बोलतेय ‘ हा कार्यक्रम सादर केला त्याचप्रमाणे एकूण 24 विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला,तसेच लोकविज्ञान दिनदर्शिका व विज्ञान माहिती पुस्तिका वाटप करण्यात आली,कार्यक्रमाप्रसंगी सौ प्रतिभाताई चव्हाण यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री.रविंद्र निकम सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ होऊन विज्ञान वृत्ती वाढावी.

झुंजार न्युज

यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे कौतुक अध्यक्षांनी केले त्याप्रसंगी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक एस.आर.निकम सर यांनी सांगितली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एच एस पाटील यांनी केले तर प्रयोग निरीक्षक म्हणून श्री एस एन पाटील व श्री आर एन पाटील यांनी काम पाहिले तर विज्ञान शिक्षक एस.बी.चव्हाण, पी.यु.राऊळ, जी.जी.वराडे यांनी प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टीम झुंजार