

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- परमपूज्य गोविंद महाराज यांच्या पावन पुण्यनगरी कासोदा तालुका एरंडोल येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्तच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त तालुक्यातील शेतकरी बांधवांना कृषीरत्न, कृषी भूषण, उच्चशिक्षित, पदवीधर, पत्रकार व विविध संस्थाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
दिनांक 4 जून 2022 शनीवार रोजी सायंकाळी सात वाजता बिर्ला चौक कासोदा करण्यात येणार आहे. तसेच सत्कार समारंभानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या 58 वा वाढदिवसानिमित्त सद्गुरू गोविंद महाराज प्रवेशद्वार ते बिर्ला चौक पर्यंतचा रोडच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे राहतील तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 58 वा वाढदिवस असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीरत्न, कृषीभूषण, उच्चशिक्षित, पदवीधर, पत्रकार व विविध संस्थाचे नवनिर्वाचित पदाधिकारी असे 58 पुरस्कार्थीना तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी पाचोरा आमदर किशोर पाटील, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील,चोपडा आमदार लताबाई सोनवणे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे,पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,जळगाव महापौर जयश्री महाजन, उपमहापौर भुषण पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी,जि प सदस्य नानाभाऊ महाजन,माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, प. स. माजी सभापती शांताबाई महाजन, मोहन सोनवणे, अनिल महाजन, दिलीप रोकडे,विवेक पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालीग्राम गायकवाड, उपतालुका प्रमुख संजय पाटील,युवा सेनेचे तालुका प्रमुख कमलेश पाटील शहरप्रमुख व नगरसेवक कृनाल महाजन यांचेसह अनेक मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन कासोदा ग्रामपंचायतचे सरपंच व शहर प्रमुख महेश पांडे शिवसेना उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी हिंमत पाटील, महानंदा पाटील, दगडू चौधरी, सोनू शेलार, अमोल भोई, संग्राम तांदळे, सुदाम राक्षे, जितेंद्र पाटील, रमेश जमादार, संजय नवाल, पुरुषोत्तम चौधरी, गोकुळ शिंपी, संदीप मराठे, दत्तू मराठे, चित्राबाई वारे, सरिता मंत्री तसेच सेनेचे पदाधिकारी सर्व पतसंस्थेचे चेअरमन कासोदा परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ व नागरिक यांच्या तर्फे करण्यात आले आहे.





