पानटपरी ते मंत्रिमंडळ ( सामान्य शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री,असामान्य प्रवासाची एक संघर्षगाथा)

Spread the love

प्रवाहाला अंत नसतो त्याला फक्त वाहत राहणार कळतं, डोंगरदऱ्यातून, झाडाझूडपातून,काट्याकुट्यातून,खाचखळग्यातून,त्या प्रवाहाचा एक संघर्षमय पण तितकाच सुंदर असा प्रवास सुरु असतो. हा प्रवास करत असताना स्वतः निर्मळ होऊन आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांच्या जीवाचं सोनं करणं हे ह्या प्रवाहाच वैशिष्ट्य.

अशाच एका प्रवाहाची ही संघर्षमय यशोगाथा


आजवर आपण अनेक प्रवाशांच्या यशोगाथा पाहिल्यात,अनुभवल्यात आणि वाचल्या. उभा महाराष्ट्र या यशोगाथाची साक्ष देत आहे.अशीच एक संघर्षमय यशोगाथा खान्देशच्या वाट्याला आली ती म्हणजे माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या रुपाने.

पानटपरी ते मंत्रिमंडळ…..


दारिद्र्याच्या काट्यातला ‘गुलाब’ ते गुलाबभाऊ
सामान्य शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री
आईच्या काळजातल लेकरू ते जनतेच्या मनात घर करणारा आवडता नेता
वक्तृत्वाचा धनी ते खान्देशची मुलुखमैदान तोफ


अशी कितीतरी नावं या प्रवासाला आपण देऊ शकतो. माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील साहेबांचा हा प्रवास कुण्या एकट्याचा नसून त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होता म्हणूनच या असामान्य प्रवासाचं रूपांतर एका अनोख्या यशोगाथेत झाल.

कधी तुम्ही मंत्रिमहोदयांना पाळधी या गावात भेटला तर ते अंतःकरणातून सांगत असतात,


“समाजाने मला गुलाबच गुलाबराव केलं”आणि मी या समाजाचे देणे लागतो म्हणून स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीवर निष्ठा ठेवून जगेन तर शिवसेनेसाठी, लढेन तर शिवसेनेसाठी आणि मरेन तर शिवसेनेसाठी हेच गुलाबरावाच्या आयुष्याचं सत्य आहे.


पाळधी या छोट्याशा गावात पानटपरी चालवणारे श्री गुलाबराव पाटील सन 1985 साली शिवबंधन हातात घेऊन शिवसैनिक झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्याप्रमाणे येसाजी कंक, तानाजी मालुसरे, मुरारबाजी,शिवा काशिद इत्यादींसारखे निष्ठावंत माणस होती. अगदी त्याच पाऊलखुणावर पाऊल ठेवत स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत माननीय श्री गुलाबरावजी पाटील या एकनिष्ठ शिवसैनिकांचा प्रवेश झाला. शिवसेनेचा बंधन हाती घेताना कुणाच्याही ध्यानीमनी नसणारा हा कार्यकर्ता पुढे जाऊन शिवसेनेच्या मंत्रिमंडळातला एक सुवर्णाक्षरी आधारस्तंभ बनतील असं कुणाला वाटलंही नसेल.

भगवद्गीता आपल्याला सांगते


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।


कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका याच भावनेने श्री गुलाबरावजी पाटील यांच्या कट्टर शिवसैनिकत्त्वाचा प्रवास सुरू झाला मग या प्रवासात 1992 सा ली पंचायत समिती सदस्य पद,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद,1997 ला जिल्हा परिषद सदस्य पद,1999 आणि 2004 साली आमदार पद असे अनेक मैलाचे टप्पे आले.
पण राजकारणातल्या प्रवासाच्या ह्या वाटेवर यशाची ही नागमोडी वळणे घेताना पाळधीतल्या सामान्य गुलाबचाभाऊंचा श्री. गुलाबरावजी पाटील असा प्रवास झाला.
त्यांच्यातला हाडाचा कार्यकर्ता, जनतेचं सुखदुःख जाणारा नेता, अभ्यास पूर्ण शैलीत विरोधकांना सळो कि पळो करून सोडणारा वक्ता, मंत्रिपदाची माळ गळ्यात पडूनही खान्देशच्या मातीशी इमान राखणारा मातृभूमीचा भक्त ह्या राजकीय यशाच्या सोनेरी वनात कधी बदलला नाही.

समर्थ रामदास म्हणतात


मना चंदनाचे परित्वा झीजावे


त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील यांचा प्रवास अखंडपणे सुरू राहिला. श्री गुलाबरावजी पाटील यांचा करारी बाणा, तलवारीच्या पाती सारखा सरळ पण तितकाच तिखट स्वभाव, कार्यकुशलता, नाविन्यपूर्ण असा शिंगाडे मोर्चा, हंडा मोर्चा , शासकीय निधीचा पुरेपूर आणि सुयोग्य वापर, नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या मतदारसंघाचा नंदनवनात केलेले रूपांतरण अशा कितीतरी गोष्टींनी श्री गुलाबरावजी पाटील नेहमीच चर्चेत राहिले.आणि सर्वसामान्यच्या मनातही राहिले.

यशाची फळे चाखत असताना अपयशाचे काटेही कधीतरी टोचून घ्यावे लागतात, स्वामी विवेकानंदांच्या मतानुसार तुम्ही चालत असलेल्या वाटेने जर अडथळे आले नाही तर तुमचा प्रवास हा चुकीच्या मार्गावर होतो. तसंच काहीसं 2009 साली माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेबानं सोबत घडलं, 2009 साली त्यांना पराभव पतकरावा लागला. पण पराभवाच विष पचवूनही श्री.गुलाबरावजी पाटलांनी आपली कर्तव्यनिष्ठा सोडली नाही.


यशाचे हजार वाटेकरी असले तरी अपयशात साथ कुणी देत नाही ही उक्ती गुलाबरावजी पाटलांच्या बाबतीत खोटी ठरली आणि शिवसेना आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहिली.
काही माणसं समाजसेवेच्या निस्वार्थ भावनेने प्रेरित असतात. राजकारणातही अशी निस्वार्थी व्यक्तिमत्व भेटतात त्यांना पदाचा किंवा खुर्चीचा मोह नसतो तर आपल्या कर्तुत्वाचा हेवा समाजासमोर ठेवावासा वाटत. स्वर्गीय श्री आनंदराव दिघे, श्री योगी आदित्यनाथ, वैकय्या नायडू, सौं प्रतिभाताई पाटील,अमित शहा, अरुण जेटली, गुलाब नबी आजाद,लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशी या सारख्या लोकांनी आपल्या ह्याच निःस्वार्थ कर्मानी जनतेला आपलंस केल त्या आदर्शांचा यादीत नाव घ्यावं असं कर्तुत्व श्री.गुलाबरावजी पाटील साहेबांच आहे.

जनता दरबाराच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडवणं, थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांची मदत करण,प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात दिवस रात्रीचा विचार न करता उभा राहणं,
विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावं म्हणून पाळधी सारख्या गावांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जीपीएस या शैक्षणिक कॅम्पसची निर्मिती करणं, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याचा प्रश्न सोडवण,वरिष्ठासाठी, अंध अपंगसाठी, महिलांसाठी उपक्रम राबवून त्यांच्या मनात तसेच मतदारसंघात ध्रुव ताऱ्यासम अस्तित्व निर्माण करणे, तरुणांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून तरुणाईला प्रोत्साहन देणे, निर्वासितांना घर,विधवांसाठी आर्थिक मदत, गरजू लोकांच्या पाल्याच्या शिक्षणासाठीची मदत, मतदारसंघात असणाऱ्या साहित्यिकांचा,शिक्षकांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा एकूणच सर्व मानव संसाधनांचा यथोचित सन्मान-सत्कार करणं अशा कामांच्या माध्यमातून श्री गुलाबरावजी पाटील साहेब कार्यकर्त्यांच्या मनात सुवर्णाक्षरांनी अंकीत झाले.
त्याच कामाच फलित म्हणून 2014 साली जळगाव ग्रामीण मतदार संघात विजयी होऊन सहकार राज्यमंत्री पदाची व परभणीच्या पालकमंत्री पदाची धुरा माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील यांनी सांभाळली.
मुत्सद्दी राजकारणी, समाजसेवक,कर्तव्यनिष्ठ शिवसैनिक,लोकप्रिय आमदार,उत्तम व्यवस्थापक, नियोजक,आदर्श पालकमंत्री हे सर्व बिरुदा सोबतच सर्वसामान्यांचं मन जाणारा, माणुसकीची बीज हातात घेऊन फिरणारा,माणसं जोडणारा,कितीतरी लोकांच्या संसाराला भाकरीचा चंद्र पुरवणारा, वयोवृद्धांचा आधारवड भासणारा,तरुणांना प्रेरणा देणारा, माता भगिनींसाठी राखीच्या धाग्याचा बंधू असणार, मतदार संघात कधी फेरफटका मारला तर आपला माणूस म्हणजे गुलाबभाऊ अशी ओळख असणारे माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व आणि पान टपरी ते मंत्रिमंडळ ही त्यांची संघर्षमय यात्रा अघटित,अवर्णनीय,अविश्वसनीय आणि एखाद्या जीवन चरित्र पर कादंबरीचा आशय व्हावी अशी अस्सल खानदेशच्या मातीच्या गोडव्यांसारखी आहे.
यशाचा हा आलेख उंचावत असताना माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांची लोकप्रियता वाढत असताना,सामान्य कार्यकर्त्याच्या ह्या असामान्य कर्तव्यनिष्ठेला दशिवसेने मार्फत यथोचित मानसन्मान मिळत असताना,2019 साली प्रचंड मताधिक्क्याने आमदार गुलाबरावजी पाटील पुन्हा निवडून आले. आणि प्रभू श्रीरामांसमान धीरगंभीरता असणाऱ्या माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, शिवबंधनाच्या नात्यातून जोडला गेलेला बंधू

लक्ष्मणाप्रमाणे माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील हे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाचा कारभार सांभाळत कॅबिनेट मिनिस्टर पदी विराजमान झाले.
मागील काही वर्षांचा विचार करता आपल्या कर्तुत्वाने,वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून नामदार श्री गुलाबराव पाटील साहेब आज सर्वदूर ओळखले जातात.


एकदा का तुम्ही मा. नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेबांच्या सभेला गेलात तर तुम्हाला अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेल्या प्रश्नांचा ऊहापोह, अतिशय मिस्कील पद्धतीने विरोधकांना काढलेले चिमटे, खानदेशच्या मातीचा आणि भाषेचा अभिमान राखत अहिराणी भाषेतून केलेली वक्तव्य, गुलजारलाही हेवा वाटावा अशी तुफान शेरोशायरी, अनेक कार्यकर्त्यांच्या शिट्ट्या हंसा आणि टाळ्या यांचा सुरेल संगम असणारी जणू काही पर्वणीच असते.


ज्याप्रमाणे नागपूर वासियांना नितीन गडकरी साहेबांचा, लातूर वासियांना स्वर्गीय श्री विलासराव देशमुख साहेबांचा, बीड वासियांना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा, पारनेरकरांना निलेश लंके साहेबांचा सार्थ अभिमान वाटतो, तसाच अभिमान, अभिमनच नव्हे नव्हे तर गर्व, सर्व खान्देश वासियांना माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेबांचा आहे.
समाजसेवक, राजकारणी,पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नांना अतिशय शांततेणे सोडवणारे धीरगंभीर व्यक्तिमत्व,अगदी ग्रामपंचायत पासून ते मंत्रिमंडळापर्यंत शिवसेनेची विजयी ध्वजपताका मोठ्या अभिमानाने फडकवणारे निष्ठावंत धारकरी, मतदार संघात आमदार म्हणून नव्हे तर सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे,

खान्देशाचं वैभव,जळगावचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब वयाच्या 57 व्यक्ती वर्षात पदार्पण करत आहेत.

ज्या वयात माणसं रिटायर होऊन आरामदायी जीवन जगण्याचा स्वप्न पाहतात त्या वयात माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांची कर्तव्य ज्योत आजही अखंडपणे तेवत आहे, आणि यापुढेही वयाच्या शंभरी पर्यंत ती तेवत रहावी अशी प्रभू चरणी प्रार्थना.

माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब, म्हणजेच आमचे लाडके मंत्रीमहोदय खूप खूप जगा, तुमच्या आशीर्वाद व कौतुकाची थाप आमच्या पाठीवर नेहमी असू द्या, परमेश्वर तुमची सर्व स्वप्न पूर्ण करून तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना.
प्रकट दिनाच्या आभाळभर शुभेच्छा दादा

©️शब्दवेडा
सचिन पाटील
प्राचार्य टीम जीपीएस
पाळधी

टीम झुंजार