उभ्या ट्रकला मारुती वॅग्नरची धडक- एक ठार दोन जखमी

Spread the love
मयत- चंद्रकांत नामदेव पाटील, अपघात ग्रस्त मारुती व्हॅगनार व ट्रक

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल :- ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या ट्रकला जळगाव येथून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती वॅगनरने मागील बाजूने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल शिवानंद ढाबा समोर झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दुपारी पाच वाजेच्याच्या सुमारास ट्रक क्रमांक सी जी 04 जे डी 0282 च्या चालकांनी हॉटेल शिवानंद बाबा च्या समोर लावला आणि ते जेवणासाठी गेले त्याच वेळी जळगाव येथून धुळे येथे भरधाव वेगाने जात असलेल्या मारुती व्हॅगनार क्रमांक एम. एच.20 सी एस 1384 च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुढे उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली.

या अपघातात चंद्रकांत नामदेव पाटील राहणार नगाव तालुका जिल्हा धुळे जागीच ठार झाले तर त्यांचे सोबत असलेले अशोक दगा तोरवणे राहणार नकाने रोड धुळे, आणि सतीश हेमचंद्र चौधरी बिजली कॉलनी स्टेडियम जवळ धुळे हे दोघे जण गंभीर जखमी झाले.


अपघातातील मयत चंद्रकांत पाटील एक शिक्षक सेनेचे पदाधिकारी असल्याचे समजते. अपघातानंतर जोरदार आवाज झाल्यामुळे शिवानंद हॉटेल मधील ग्राहक व कारागिरांनी अपघात कडे धाव घेतली त्याच वेळी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन जळगाव येथून विवाह समारंभ आटोपून एरंडोल येत होते त्यांनी अपघातस्थळी वाहन थांबवून एरंडोल पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आमदार अनिल पाटील अखिल मुजावर जुबेर खाटीक संतोष चौधरी महेंद्र पाटील यांनी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावचे खाजगी रुग्णालयात रवाना केले.

याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान अपघातात मयत झालेले व गंभीर जखमी रेल्वे इंकीरी जळगाव येथे विवाह समारंभ आटोपून धुळे येथे जात असताना रस्त्यावरच दुर्देवी घटना घडली.
फोटो ओळी: 1)
2)

टीम झुंजार