सोयगाव घरफोडी प्रकरण…शेंदूरणीतून एकास अटक

Spread the love

सोयगाव :- शहरातील जुना बाजार चौक भागातील घरफोडी प्रकरणातील एकास सोमवारी ता.०६ दुपारी सोयगाव पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील शेंदूरणी गावातून अटक केली आहे.या प्रकरणातील एका आरोपीस ४८ तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सोयगाव पोलिसांना यश आले आहे


शहरातील जुना बाजार चौक भागात शनिवारी ता.०४ कुटुंबातील सर्वच सदस्य लग्नाला गेल्याचे पाहून भरदिवसा युनूस तुराब शहा यांच्या घराचे कुलूप तोडून व कपाटातून ३० हजार रु रोकड व सोन्याचे १४ ग्रॅमचे दागिने किंमत ७० हजार रु असा एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोयगाव पोलिसांचे दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आल्यावर चौकशीच्या आधारे शेंदूरणी ता जामनेर येथील एक मोटारसायकल या भागात आल्याचा सुगावा सोयगाव पोलिसांना मिळाला त्यावरून त्या संशयित मोटारसायकलचा शोध घेतला .

असता,सदरील दुचाकी शेंदूरनी ता जामनेर ची असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाल्यावरून सोयगाव पोलिसांनी सोमवारी थेट शेंदूरणी गावात सापळा रचून मोटारसायकल सह संदीप गुजर(,वय ३६ रा.शेंदूरणी ता जामनेर यास संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली त्याच्या मोटार सायकल च्या डिक्कीत कुलूप तोडण्याचे साहित्य मिळून आल्यावर पोलिसांचा संशय आणखीनच बळावला त्यामुळे आरोपी संदीप गुजर यास ताब्यात घेऊन सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्याचे आणखी काही साथीदार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

औरंगाबाद ग्रामीनचे पोलीस अधीक्षक मनीष कळवनिया, उपविभागीय पोलीस विजयकुमार मराठे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,पोना ज्ञानेश्वर सरताळे, राजू बरडे, सादिक तडवी, सागर गायकवाड, रवी तायडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे

टीम झुंजार