पूर्णा (प्रतिनिधी) :- शहरातील नगर परिषदेतील राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृहात ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपले दर्पण हे वृत्तपत्र ६ जानेवारी या दिवशी प्रकाशित केले होते. कार्यक्रमास अध्यक्ष – महाराष्ट्र मीडियाचे उपसंपादक सय्यद अली सय्यद हसन,प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक माहेबूब कुरेशी, दैनिक भास्कर चे रमेश गायकवाड, दैनिक प्रजावणी चे सय्यद कलीम,महाबोधी न्युज चॅनल चे प्रदीप नन्नवरे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पत्रकारांची एकता नसल्याने व आपसी मतभेदाने आपण पूर्णा शहरात पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन आपण उभारू शकलो नाही.स्वार्थापोटी काहींनी पत्रकारिता राजकीय दावणीला बांधली आहे की काय ..? असा प्रश्न दैनिक भास्करचे रमेश गायकवाड यांनी यावेळी उपस्थित करून आपले मत व्यक्त केले.
समस्त पत्रकार बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे प्रदीप नन्नवरे यांनी सांगितले. समाजात पत्रकारिता करत असताना काही उच्च पदस्थ जेष्ठ पत्रकारांकडून संघटनेच्या पदासाठी जातीची समीकरणे का लावली जातात..? असा प्रश्न यावेळी नागेश नागठाणे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. पत्रकार बांधवांनी आपल्यावर झालेल्या अन्याय,अत्याचारा विरोधात शेवट पर्यंत लढा दिला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नये नक्कीच विजय होईल असे मत सय्यद अली सय्यद हसन यांनी व्यक्त केले.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका यावेळी वाटप करण्यात आल्या.दर्पण दिनाचे औचित्य साधून पूर्णा टाइम्स व क्रांतीमय भारत चा शुभारंभ यावेळी करण्यात आला. सदरील कार्यक्रमास रमेश गायकवाड दै.भास्कर, नागेश नागठाणे-पूर्णा टाईम्स, कैलास बलखंडे-क्रांतीमय भारत न्यूज, प्रदीप नंनवरे-महाबोधी न्यूज, सय्यद कलीम-दै.प्रजावणी, अनिल आहिरे-दर्जा महाराष्ट्र न्यूज, संजय वाघमारे-दै. क्रांतिशस्त्र, दिलीप जोंधळे-9X न्यूज, राजू गायकवाड-आवाज परभणीचा न्यूज, रविंद्र नरवाडे-न्यूज लोकजागृती,चंद्रकांत उगले-BBM न्यूज, संपत तेली-दै.तरुण भारत, सतिश धुळे, संतोष पुरी दै झुंजार नेता, संपत तेली दै तरुण भारत आदी पत्रकार बंधवासह सामजिक कार्यकर्ते,नागरिकांची उपस्थिती होती.