
नाशिक :- सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अश्यातच नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकाचा कंपनीच्या गेटवरच चाकू व तलवारीने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. आईला कामावरून काढून टाकल्याने अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलानेच हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार निवृत्ती आहेर (५०, रा. महात्मानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश रामचंद्र सूर्यवंशी (१९) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी आहेर आपल्या चारचाकीतून गेटवर उतरत असताना, अगोदरच दबा धरून बसलेले ३ युवक थेट धावत येत आहेर यांच्यावर तलवार व चाकूने वार करू लागले. या हल्ल्यात आहेर गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. या सर्व प्रकाराने झालेल्या आरडाओरडीने कंपनीतील काही कामगार बाहेर पळत आले. हल्ल्यानंतर युवकांनी आपल्या हातातील हत्यारे तेथेच टाकून दुचाकीवरून धूम ठोकली.
एक हल्लेखोर जखमी
संशयित हल्लेखोरांनी तलवार, चॉपरचा वापर केला. आहेर यांना चॉपरचा वार करताना एका हल्लेखोराच्या मांडीवर घाव लागला. त्यामुळे आरोपीचे रक्त रस्त्यावर सांडले होते. जखमी संशयिताला दुचाकीने पळवून नेताना रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाच्या अधारे पोलिसांना एका खासगी रुग्णालयापर्यंत माग काढला. अविनाश रामचंद्र सूर्यवंशीला ताब्यात घेतले. इतर तीन संशयित अद्याप फरार आहेत.
नेमकी घटना काय?
नगर परिसरात राहणारे नंदकुमार आहेर यांचा ऑटोमोबाईल पार्ट तयार करण्याचा व्यावसाय आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमधील गरवारे पॉईंट जवळील सीमेन्स कंपनीसमोर ही शेडमध्ये छोटी कम्पनी आहे. नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर आज सकाळी कंपनीत आले. कंपनीजवळ कारमधून उतरत असतानाच आधीपासून काही अंतरावर वाट पहात असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी तलवार आणि कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.
आहेर यांचा आरडाओरडा ऐकून कंपनीत काम करणारे धावत बाहेर आले, आहेर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
हल्ल्यामागचं कारण काय?
नाशिक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर वीस वर्षाच्या आतील असून त्याची आई आहेर यांच्या कंपनीत कामाला होती. कंपनीत तिचा छळ आणि अपमान होत असल्याचं तीने आपल्या मुलाला सांगितलं होतं. याचा बदला घेण्यासाठी मुलाने आहेर यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलं असून दोघांचा शोध सुरु आहे.
नाशिक शहर व परिसरामध्ये मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली खुनाची मालिका अद्यापही संपता संपत नसल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये नाशकात झालेली खूनाची ही आठवी घटना आहे. यामुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.
आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार आहेर यांचा खून करण्यात आला असून घटनास्थळी तपास करताना पोलिस.





