सोयगाव तालुक्यात तासभर वादळी वाऱ्याचा तडाखा….विजांचा कडकडाट

Spread the love
पहुरी-घोरकुंड रस्त्यावर आडवी पडलेली झाडे

सोयगाव :- दि.०९…सोयगावसह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याने तालुक्यात तासभर धुमाकूळ घातल्याने सोयगाव तालुक्यात धावपळ उडाली होती वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सोयगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली तर काही भागात वाहतूक ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले
सोयगाव सह तालुक्यात सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला यामध्ये तालुकभर वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातल्याने तालुक्यात गोंधळ उडाला होता. दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन कडून हाती आली आहे.

अचानक वादळी वाऱ्याने सोयगाव तालुक्याला तासभर झोडपले तर विजांचा कडकडाट जोराचा होता वादळी वाऱ्यामुळे सोयगाव तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला होता विजांचा कडकडाटामुळे सोयगाव तालुक्यात घबराट पसरली होती झाडे आडवी पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती वादळी वाऱ्यात शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या उडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयगाव परिसरात वादळी वाऱ्याचा जोर अधिक होता गोदेगाव,पहुरी घोरकुड ,वाकडी आदी परीसरात वादळी वारासह तुरळक पाऊस
वरठाण बनोटी परीसरात वादळ वादळाने कहर केला होता रात्री उशीरापर्यंत तालुक्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता

टीम झुंजार