बोगस बियाणे : अमळनेर तालुक्यात भरारी पथकाने गोदामातून जप्त केली 62 हजार बियाणांची 50 पाकिट

Spread the love

अमळनेर :- सध्या सर्वत्र कापूस लागवड करण्यासाठी धडपडत चालु आहे पण शेतकरयांना बोगस बियाणे विक्री केली जात आहे असाच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होणाऱ्या कापसाची अनाधिकृत, बोगस बियाणे रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 भरारी पथकाची नियुक्ती केली. या पथकाने आठ दिवसात दुसरी कारवाई करत अनाधिकृत बियाणे जप्त केली आहेत. अमळनेर तालुक्यातील कळंब येथील गोदामातून 62 हजार 500 रुपयांची 50 एचटीबीटी कापूस बियाणांचे पाकीटे जप्त.

साफळा रचुन केली जप्तीची कारवाई…

राज्यात मान्यता नसलेले व विक्रीला बंदी असलेले एचटीबीटी या वाणाचे कापूस बियाणे या पथकाने राजेंद्र धोंडुसिंग राजपुत यांच्या गोदामातून जप्त केले आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरक्षक अरुण श्रीराम ताहडे, नाशिक विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाचे तंत्र अधिकारी, जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयाचे जिल्हा अधिक्षक संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांच्या मार्गदर्शनाने कृषि सहाय्यक गणेश पाटील, श्रीमती विद्या पाटील यांच्या पथकाने अमळनेर पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी अमोल भदाणे यांच्या सहकार्याने सापळा रचुन ही कारवाई केली आहे.

मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा…

या प्रकरणी राजेंद्र धोंडुसिंग राजपुत यांच्या विरुध्द मारवाड पोलिस ठाण्यात सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टीम झुंजार