
लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील शारा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी 40 फुटाचा रस्ता होता परंतु आज रोजी तो रस्ता अतिक्रमण धारकांनी त्यावर अतिक्रमण करून तो फक्त 20फुटाचा राहीला आहे,सदर शेतरस्ता त्यावर गावातील नागरीकांनी अतिक्रमण करुण रस्ता पुर्ण बंद केला आहे.असे असताना आज ७ जून रोजी शारा येथील जेष्ठ नागरीक नंदु मापारी व इतर शेतकरी यांनी गावामध्ये बँनर हातात घेऊन मिरवणुक काढून रस्ता खुला करुन देण्याची सरंपच,ग्रामसेवक,तलाठी यांच्याकडे मागणी केली आहे.
पेरणीचे दिवस जवळ आले असून शेतरस्तातचे महत्त्व काय असते हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे,परंतु शेतरस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे शेतामध्ये फेरणी करण्यासाठी कसे जावे हा प्रश्न पडतो कारण बऱ्याच वेळेस शेत रस्त्या अभावी शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते शिवाय प्रसंगी शेत रस्त्यामुळे भांडणाला सामोरे जावे लागते ही सर्व टाळण्यासाठी शेतकरी प्रशासनाकडे शेत रस्त्यासाठी विविध मागणी,अर्ज,विनंत्या करून रस्त्याची मागणी करत असतो परंतु शासन त्याकडे पाठ फिरवून शेतकऱ्याची एक प्रकारे थट्टाच करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध मार्गाचा अवलंब करून आंदोलन करावे लागते बऱ्याच वेळेस तर शेतकऱ्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येते जर वेळेस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्न मिटला नाही तर शेतकऱ्यांना आपले शेत पडीक ठेवावे लागते.
तरी आता प्रशासनाने शेतकरी जगला पाहिजेत असे वाटत असेल तर शेतरस्ते च्या समस्यांना लवकरात लवकर मार्गी लावावे.
याच आधारावर शारा येथील शेतकरी नंदु मापारी व इतर शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी गावातून बॅनर हातात घेऊन डफडे वाजवत प्रशासनाला कुंभकर्णाच्या झोपेतून जागं करण्याचं एक प्रकारे प्रयत्न केला आहे असं समजावे लागेल भविष्यात पाहावे लागेल की त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळते.





