
मेष :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह
हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान • सन्मान होतील. दुपार नंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा.
वृषभ :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपार नंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.
मिथुन :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो. कुटुंबात शांतता नांदेल.
कर्क :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे.
सिंह :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्य नरम गरम राहील. कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उदभवेल.
कन्या :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.
तूळ :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह राहील.
वृश्चिक :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल.
धनु :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार – व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार केल्यास आपण अडचणीत येऊ शकाल. व्यावसायिक नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो. विचार पूर्वक कामे नक्षेत्रात वावरताना आपले वक्तव्य संयमित ठेवावे.
मकर :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासून सुद्धा लाभ संभवतो.
कुंभ :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते.
मीन :
आज चंद्र तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणाऱ्या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापार व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. शक्यतो आज वाद टाळावेत.





