समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न देवेंद्र साळी करीत आहेत. आ. चिमणराव पाटील.

Spread the love
फोटो:-संजय चौधरी यांच्या सत्कार करतांना आ चिमणराव पाटील,अँड किशोर काळकर,भगरे गुरुजी,,डॉ.रत्नाकर गुट्टे व इतर मान्यवर
फोटो:-आल्हाद जोशी यांच्या सत्कार करतांना आ चिमणराव पाटील,अँड किशोर काळकर,भगरे गुरुजी,,डॉ.रत्नाकर गुट्टे व इतर मान्यवर

एरंडोलला देवेंद्र साळी,आल्हाद जोशी,संजय चौधरी व जयश्री कुलकर्णी यांच्या नागरी सत्कार.

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल- किर्गीस्तानचे भारतातील मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवल्यामुळे ते समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.किर्गीस्तांचे मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी याना एसएमटी युनिवर्सिटी यु.एस.ए.यांच्यातर्फे नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड ऑननरी डॉक्टरेट (विद्या वाचस्पती) मिळाल्याबद्दल

तसेच ‘सकाळ’चे तालुका बातमीदार आल्हाद जोशी याना जिवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी, झुंजार न्यूज पोर्टलचे संपादक संजय चौधरी यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी याना राज्यस्तरीय नारीदीप सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार चिमणराव पाटील,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड किशोर काळकर,अध्यात्म वाचस्पती अतुल शास्त्री (भगरे गुरुजी),डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याहस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.देवेंद्र साळी यांच्या १९८८ मधील दहावीच्या वर्गातील मित्रपरिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्यात हनुमान चालीसावरून सुरु असलेल्या राजकारणाबद्दल आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांचेवर अप्रत्यक्ष टीका केली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी मतदारांना पळवतात मात्र सद्यस्थितीत आमदारांची देखील पळवापळवी होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात हि शोकांतिका असल्याचे सांगितले.देशात जात,धर्म,पैसा आणि प्रलोभने याकडे पाहून मतदान होत असल्यामुळे लोकप्रतिनिधींना मतदारांची भीती वाटत नसल्याचे सांगितले.देवेंद्र साळी यांनी माणसांना जोडण्याचे काम केल्यामुळे त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगितले.भाजपचे अँड.किशोर काळकर यांनी एका विचारावर आणि निष्ठेवर ठाम राहणा-या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष कै.नेल्सन मंडेला यांच्या नावाने देवेंद्र साळी यांना मिळालेला पुरस्कार महत्वाचा असल्याचे सांगितले.

राजकीय जीवनाच्गी सुरुवात १९८८ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांपासून सुरु झाली असून पालिका निवडणुकीत या विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे विजयी झाल्याची आठवण त्यांनी करून दिली.नेतृत्व करण्याचे गुण देवेंद्र साळी यांच्यात असून मोठ्या पदावर असून देखील ते आपल्या जन्मभूमीला विसरले नसल्याचे सांगितले.धार्मिक,सामाजिक कार्याची आवड असणा-या देवेंद्र साळी यांनी भविष्यकाळात देखील अशीच कामे करावेत असे आवाहन केले.

डॉ.अतुल शास्त्री यांनी प्रत्येक क्षेत्रात मुलाने आणि शिष्याने गगनभरारी घ्यावी असे वडील आणि गुरुंना वाटत असल्याचे सांगितले.प्रत्येकाने जिवनात कर्म,कर्तव्य,कर्तृत्व आणि कृतार्थ या चार जबाबदा-या पार पाडाव्यात असे आवाहन केले.देशात विविध समस्या असतांना हनुमान चालीसावरून राजकारण होत असल्याबद्दल त्यांनी काहंत व्यक्त केली.यावेळी डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.

बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापिका क्षमा साळी यांनी सुत्रसंचलन केले.प्राचार्य सुधीर महाजन यांनी आभार मानले.कार्यक्रमास निवृत्त तहसीलदार अरुण माळी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक शरद बागल,वे.शा.संपन्न केतन पाठक,advt.ओम त्रिवेदी,सुरतचे नगरसेवक सुरेश सोनावणे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,जळगावचे नगरसेवक देशमुख मामा,गोल्डमन मकरंद साळी,उद्योजक संजय जाधव,विजय जाधव,विनायक कुलकर्णी,कृष्णा धनगर,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,डॉ.नरेंद्र पाटील,मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने,शोभना साळी यांचेसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र साळी यांचा शहरातील नागरिक व विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी उद्योजक पंकज काबरा,प्राचार्य सुधीर महाजन,नितीन साळुंखे,महेश महाले,सुनील महाजन,अनिल काळे,रवींद्र कुलकर्णी सोमनाथ कासटकर,गजानन पाटील यांचेसह पदाधिका-यांनी सहकार्य केले.

    

टीम झुंजार