गोंदेगाव सेवासंस्थेवर शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व…प्रतिस्पर्धीना केवळ तीन जागा….

Spread the love
गोंदेगाव सेवासंस्थेवर विजयी झालेले शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार….

सोयगाव :- सहकार क्षेत्रात जिल्ह्यात दोन क्रमांकावर असलेल्या सहा गावांचा समावेश असलेल्या गोंदेगाव सेवासंस्थेवर तेरा पैकी दहा जागा बळकावून शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविली आहे या निवडणुकीत प्रतिस्पर्धी प्रगती विकास पॅनेलला एका बिनविरोध कागेसः केवळ तीन जागा वर विजय मिळविता आला आहे.

सोयगाव तालुक्यात अव्वल आणि जिल्ह्यात दोन नंबर वर असलेल्या सहकार क्षेत्रातील सहा गावांचा समावेश असलेल्या गोंदेगाव सेवा संस्थेची निवडणूक अटीतटीची झाली होती या सोसायटी साठी प्रगती विकास पॅनेल ची एक जागा बिनविरोध आल्यावर तेरा पैकी बारा जागांसाठी मतदान झाले यामध्ये तब्बल १० जागांवर शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी एकहाती सत्ता मिळवीत गोंदेगाव सोसायटी ताब्यात घेतली आहे.शेतकरी विकास पॅनेल चे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे—

चुडामण करनकाळ,संजय जैस्वाल,पोपट धुमाळ,बालू नगरे,संभाजी नेरपगार,भैयासाहेब बोरसे,कडूबा माताडे,महिला राखीव मधून वर्षा ढमाले,वैशाली महालपुरे,इतर मागासवर्गीय मधून सोमनाथ महालपुरे या दहा उमेदवारांचा विजय झालेला आहे यासाठी शेतकरी विकास पॅनेल प्रमुख डॉ,प्रमोद महालपुरे,अविनाश नेरपगार,निलेश मगर,सुनील बोरसे,शांताराम महाजन,बाळू जंजाळ आदींनी पुढाकार घेतला होता.

सोयगाव तालुक्यातील एकमेव सर्वात मोठी सेवा संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदेगाव सोसायटी मध्ये

गोंदेगाव,म्हशीकोठा,वनगाव,पहुरी,वाकडी,घोरकुंड या सहा गावांचा समावेश आहे.त्यामुळे राजकीय दृष्ट्या या सेवासंस्थेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते.

टीम झुंजार