दुर्दैवी घटना! आजाराला कंटाळून 22 वर्षीय युवकाची गळफास घेऊन केली आत्महत्या

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
कासोदा:- ता एरंडोल येथील नाभिक समाजाचे कार्यकर्ते संतोष बाबूलाल ठाकरे यांच्या पुतण्या जयेश दगडू ठाकरे (वय २२) याने आज दि.१२ जून २०२२ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली.

जयेश दगडू ठाकरे यास आई-वडिल नसल्याने त्याचा सांभाळ त्याचे काका पांडुरंग बाबुलाल ठाकरे हे करीत होते जयेश हा लहानपणापासून पांडुरंग ठाकरे यांच्यासोबत साई पार्क येथेच राहत होता. घरात पुढच्या खोलीत पांडुरंग ठाकरे व कुटुंबातील सदस्य झोपलेले असता जयेश याने दीर्घ आजाराला कंटाळून दि. १२ जून २०२२ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी घराच्या मागील खोलीच्या छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे

सकाळी पांडुरंग ठाकरे यांच्या निदर्शनास आल्याने त्यास खाली उठवून त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथील डाॅक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन होत नसल्यामुळे मयतास एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले डॉ मुकेश चौधरी यांनी मयताचे शवविच्छेदन करून नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले.

याबाबत शेजारी राहत असलेले अजय संजय निकम यांनी दिलेल्या खबरीवरून कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सहदेव घुले, पोलीस नाईक अमृत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण हटकर हे करीत आहे.

टीम झुंजार