एरंडोल– 2022 हे नवीन वर्ष सुरू झाले आहे. जानेवारी महिन्यात मकर संक्रांत असून या महिन्यात खरमास संपणार आहे. 15 जानेवारीला मकर संक्रात आहे. संक्रांत संपल्यानंतर शुभ कार्य करण्यासाठी कोणतीही अडचण असणार नाही. त्यामुळे लवकरच लग्न, मुंज, साखरपुडा, गृहप्रवेश यासाठी शुभ मुहूर्त सुरू होणार आहे.तुळशी विवाह पार पडल्यानंतर यंदा लग्नसराईचा जोरदार माहौल सुरू झाला होता. पण 15 डिसेंबर 2021 पासून मल मासामुळे विवाहांना ब्रेक लागला आहे.
सुर्य धनु राशीत प्रवेश करतो, त्या दिवसांपासून खरमास सुरू होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. मात्र जेव्हा सुर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास समाप्त होतो.दरम्यान, शुभ कार्यांसाठी गुरु प्रभावी किंवा उच्च स्थानात असणं आवश्यक असतं. आता जानेवारी महिन्यात खरमास संपत असल्याने पुन्हा एकदा शुभ कार्य करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आनंदाची बाब म्हणजे येथून पुढे डिसेंबर महिन्यापर्यंत लग्नाच्या 94 तिथी आहेत.
दरम्यान, या नवीन वर्षात कोणत्या महिन्यात लग्नतिथी आहे? थोडक्यात जाणून घेऊयात…वर्ष 2022 मधील शुभ मुहूर्त जानेवारी महिन्यात 22, 23, 24 आणि 25 जानेवारी हे शुभ मुहूर्त आहेत.
फेब्रुवारी महिन्यात 5, 6, 7, 9, 10, 18, 19 आणि 20 फेब्रुवारीला लग्नाचा चांगला मुहूर्त आहे.
एप्रिल महिन्यात 15, 16, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 27 एप्रिलला शुभ मुहूर्त आहे.
मे महिन्यात 2, 3, 4, 9, 10, 11, 12, 16, 17, 18, 20, 21, 26, 27 आणि 31 मे या लग्नाचा चांगला मुहूर्त आहेत.
जून महिन्यात 1, 6, 8, 10, 11, 13, 20, 21, 23 आणि 24 जूनला लग्नाचा चांगला मुहूर्त आहे.
जुलै महिन्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 14, 18, 19, 20, 21, 23, 24, 25, 30 आणि 31 जुलैला शुभ मुहूर्त आहे.
ऑगस्ट महिन्यात 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 14, 15, 19, 20, 21, 28, 29, 30 आणि 31 ऑगस्टला लग्नाचा चांगला मुहूर्त आहे.
सप्टेंबर महिन्यात 1, 4, 5, 6, 7, 8, 26 आणि 27 सप्टेंबरला शुभ मुहूर्त आहे.
डिसेंबर महिन्यात 2, 4, 7, 8, 9 आणि 14 डिसेंबर या दिवशी लग्नाचे चांगले मुहूर्त आहेत.नवीन वर्ष 2022 मध्ये मार्च, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी कोणताही मुहूर्त नाही.
दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक राज्यांनी आपआपल्या राज्यात निर्बंध लावण्यात सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लग्न सोहळ्यावरती निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी 94 तिथी असल्या तरी लग्नसमारंभात गर्दी न करता नियमावलीचे पालन करून शुभविवाह पार पाडावे लागणार आहे.