दि 10जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी,फ्रंट लाइन वर्कर व 60 वर्षावरील नागरीक यांना कोविड लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार.

Spread the love

एरंडोल शहर प्रतिनिधी

एरंडोल.दि 10जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी,फ्रंट लाइन वर्कर व 60 वर्षावरील नागरीक यांना कोविड लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

तरी ज्यांचे या आधी दोन डोस पूर्ण झाले आहे व दुसरा डोस च्या तारखेनंतर नऊ महिने (39आठवडे) पूर्ण झाले आहे त्यांनी बूस्टर डोस (Precaution dose)घ्यावा.ज्यांनी आधी दोन डोस कोविशील्ड घेतली आहे त्यांना कोविशील्डच द्यावी व ज्यांनी दोन डोस कोव्हॅक्सीन घेतले आहे त्यांना कोव्हॅक्सीन द्यावी.

आपणास सूचित करण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांचे बुस्टर डोस लसीकरण (ज्यांचे दुसरा डोस घेऊन 39 आठवडे पूर्ण झाले आहेत असे) उद्या व परवा ऑफलाईन पूर्ण करावे व त्याची नोंदणी ऑनलाईन ला 10 तारखेला करण्यात यावी.

मा जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशानुसार.

टीम झुंजार