जळगाव :- सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच महामार्गावरुन भरधाव वेगात येणाऱ्या प्रवासी रिक्षेस रस्ता ओलांडणाऱ्या नीलगायीने धडक दिली. या अपघातात रिक्षेतील एक प्रवासी जागीच ठार झाला तर उर्वरीत आठ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री आठ वाजता जळगाव – भुसावळ महामार्गावरील टीव्ही टॉवर समोर हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी की एमएच 19 व्ही 9521 क्रमांकाची रिक्षा भुसावळ येथे लग्नकार्यासाठी गेलेल्या नसरीम शेख, शाबीर बागवान, मोहम्मद रमजान, सहील शेख , बबीता बडगुजर लग्नकार्य आटोपून जळगावच्या दिशेने पुन्हा येत होते. यावेळी तरसोद फाट्याजवळ असणाऱ्या दूरदर्शन टॉवर जवळ अचानक त्यांच्या भरधाव रिक्षे समोर नील गाय आली व त्यांच्या रिक्षाला धडकली. या धडकेमुळे रिक्षा दोन वेळा पलटी खात खाली पडली. यावेळी साबिर भगवान वय 40 यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. व नरिम शेख, मोहम्मद असलम जान, बबिता बडगुजर, साहिल बागवान हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
रिक्षाचा पुर्ण चुराळा.
नील गाडीला धडक मारताच रिक्षाने दोन वेळा पलटी मारली व या मुळे रिक्षेचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळाले. या भीषण अपघातात टीव्ही टॉवर जवळ भगवान यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नाहुन परतताना झाला अपघात
ही सर्व मंडळी भुसावळ येथे लग्नासाठी गेले होते लग्न झाल्यावर ते भुसावळ होऊन जळगावला रवाना झाले होते. जळगाव ला येत असताना दूर्दर्षण टॉवर जवळ त्यांचा हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी व मृतास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले. सिविल हॉस्पिटल मध्ये पोस्ट डॉक्टरांनी साबिर बागवान यांना मृत घोषित केले. साबीर बागवान यांच्या पश्चात आई पत्नी व दोन मुली व एक मुलगा आहे, तर काही जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.