ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पहिल्याच पावसात चार गावांचा संपर्क तुटला…..

Spread the love

पहिल्याच पावसात पर्यायी रस्ता पाण्याने गेला वाहून.

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार तालुक्यातील महारचिकणा परिसरामध्ये काल जोरदार पाऊस पडल्यामुळे महारचिकणा नदीवरील तात्पुरता तयार केलेला रस्ता पाण्याच्या वेगाने वाहून गेला.


महारचिकणा फाटा ते कोनाटी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून रस्त्याचे काम चालू आहे. नदीवरील पुलाचे बांधकाम संथ गतीने चालू असल्यामुळे शेजारूनच मुरूम टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. पाण्याच्या पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे महारचिकणा, कोनाटी ,देऊळगाव कोळ,या गावाचा संपर्क तुटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या गावांमधून येणारा हा मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बी-बियाणे भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी पंचायत निर्माण झाले आहे. पेरणी सुरू होत असून शेतकऱ्यांना शेतात बियाणे व खते कसे न्यावे हा प्रश्न शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पडला आहे.नदीवरील पुलाचे काम संथ गतीने चालू असून संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पर्यायी रस्ता द्यावा ही ग्रामस्थांना व प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.

टीम झुंजार