एरंडोल पालिकेची आरक्षण सोडत जाहीर.२३ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल :- नगरपालिकेच्या अकरा प्रभागातील आरक्षण सोडत आज दुपारी पालिका कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी जाहीर केली.यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांचेसह पालिका कर्मचारी व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.पालिकेच्या अकरा प्रभागाती २३ जागांपैकी १२ जागा महिलांसाठी राखीव आहेत.यामध्ये अकरा जागा खुल्या गटातील महिलांसाठी तर एक जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे.पालिका प्रभागातील आरक्षण सोडत आज दुपारी काढण्यात आली.

प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे.– प्रभाग क्रमांक एक-अ-सर्वसाधारण महिला,ब-सर्वसाधारण.प्रभाग क्रमाक दोन-अ-अनुसूचित जमाती महिला ब-सर्वसाधारण.प्रभाग क्रमांक तीन-अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला.प्रभाग क्रमांक चार-अ-सर्वसाधारण महिला,ब-सर्वसाधारण.प्रभाग क्रमांक पाच-अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण.प्रभाग क्रमांक सहा-अ-सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण.

प्रभाग क्रमांक सात अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण.प्रभाग क्रमांक आठ-अ-सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण.प्रमाग क्रमांक नऊ-अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण.प्रभाग क्रमांक दहा-अ-सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण.प्रभाग क्रमांक अकरा-अ-सर्वसाधारण महिला,ब-सर्वसाधारण महिला,क-सर्वसाधारण.अकरा प्रभागातील २३ जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी अकरा,अनुसूचित जमाती महिलांसाठी एक अशा बारा जागा महिलांसाठी तर दहा जागा सर्वसाधारण आणि एक जागा अनुसूचित जाती साठी आहे.

२०१६ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत दहा प्रभागात वीस जागा होत्या.यावेळी एक प्रभागाची वाढ झाल्यामुळे तीन जागांची वाढ झाली असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.आरक्षण सोडत प्रसंगी प्रमोद महाजन,चिंतामण पाटील,राजेंद्र ठाकूर,विठ्ठल आंधळे यांचेसह पालिका कर्मचारी,विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

टीम झुंजार