दुर्दैवी ; विजेचा धक्का लागून हिरडव येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love
मृत शेतकरी माधवराव रामभाऊ मुंड

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- आज दिनांक 14 जून 2022रोजी,तालुक्यातील हिरडव येथील शेतकरी शेतातील भाजीपाला पिकाला. पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता. त्यांना जबर विजेचा धक्का लागून त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.


हिरडव येथील शेतकरी माधवराव रामभाऊ मुंडे हे शेतातील भाजीपाल्याला पाणी देण्यासाठी दुपारी अडीच च्या दरम्यान शेतात विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता विजेचा जबरदस्त धक्का लागून त्यांचा घटनास्थळी जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावातील मंडळी व नातेवाईक घटना स्थाळी धाव घेतली असून,पुढील तपास बीट जमादार करीत आहे.

टीम झुंजार