‘संगम’चा दशक्रिया विधी करून पन्नास साईगजानन भक्तांनी केले मुंडण.

Spread the love

संगमचा पुतळा उभारण्याचा निर्णय.

एरंडोल– येथील साई गजानन संस्थानच्या एरंडोल शेगाव पायी वारीत सहभागी झालेल्या संगम घोड्याचे मलकापूर तालुक्यातील वडनेर भोलजी येथे वारीतच हृदयविकाराने निधन झालेल्या शोकाकुल साईगजानन भक्तांनी त्याचा दशक्रिया विधी करून सुमारे पन्नास भक्तांनी मुंडण केले.संगमचा लळा लागलेल्या भक्तांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.मंदिर परिसरातच संगम्वर हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आले.अन्त्यावीशी केलेल्या जागेवर संगमाचा पुतळा उभारण्याचा निर्णय संस्थानचे अध्यक्ष बापू मोरे यांचेसह पदाधिकारी व भक्तांनी घेतला आहे.

  येथील साई गजानन संस्थानच्यावतीने सुमारे पस्तीस वर्षांपासून दरवर्षी एरंडोल ते शेगाव भक्तांची पायी वारी काढण्यात येते.यावर्षी देखील २५ डिसेंबरला पायी वारी निघाली होती.वारील संस्थानचा सुमारे वीस वर्ष वयाचा संगम घोडा सहभागी झाला होता.संगमने एरंडोल शेगावच्या १४ तर एरंडोल शिर्डीच्या ५ अशा १९ वा-या केल्या होत्या.मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहत असलेला संगम मंदिराचे तसेच भाविकांचे विशेष आकर्षण होते.संगमचा नमस्कार केल्याशिवाय भाविक मंदिरात जात नव्हते.साईगजानन परिवारातील युवक,वयोवृद्ध भाविक संगमावर घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम करून त्याची काळजी घेत होते.संगम भक्तांच्या परिवारातील सदस्य बनला होता.शेगाव पायीवारी मलकापूर येथे मुक्कामी असतांना अचानक संगमची तब्येत बिघडली होती.त्याचेवर पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपचार देखील केले होते.सकाळी संगम ठणठणीत बरा झाल्यामुळे वारीत सहभागी झाला होता.वडनेर भोलजी (ता.मलकापूर) येथे वारीतच २९ डिसेंबरला संगमला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.संगमच्या निधनाची बातमी वारक-याना समजताच वारीवर शोककळा पसाराळी आणि भक्त लहान मुलासारखे रडू लागले.संगमवर रात्री मंदिर परिसरातच हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.संगम आपल्या परिवारातील सदस्य असल्यामुळे त्याचा दशक्रिया विधी,उत्तरकार्यासह सर्व धार्मिक विधी करण्याचा निर्णय भक्तांनी घेतला.आज संगमचा दशक्रिया विधी मंदिर परिसरात करण्यात येवून मंदिराचे अध्यक्ष बापू मोरे यांचेसह सुभाष ठाकूर,अजय महाजन,किशोर महाजन,अनिल पाटील,चेतन महाजन यांचेसह सुमारे पन्नास भाविकांनी मुंडण करून संगमला श्रद्धांजली वाहिली.जळगाव येथील डॉ.मिलिंद चौधरी यांची तीन वर्ष वय असतांना संगम मंदिरास भेट म्हणून दिला होता.संगमचे निधन झाल्याचे डॉ.मिलिंद चौधरी  याना कळताच त्यांनी संगमचा लहान भाऊ असलेला दुसरा घोडा मंदिरास भेट म्हणून दिला आहे.संगमचे उत्तरकार्य झाल्यानंतर त्यास मंदिरात आणून त्याच्या स्वागताचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष बापू मोरे यांनी सांगितले.सर्व गजानन भक्तांनी मंदिर परिसरात संगमचा पुतळा बसवून त्याच्या स्मृती कायम जपण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम झुंजार