जंक्शन येथे जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांचे वाजत-गाजत स्वागत..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
जंक्शन : ( ता. इंदापूर )
शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ ला जंक्शन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत चिमुरड्या मुलांचा पहिला दिवस असल्याने प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची लेझीम-ढोलच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी सर्व विद्यार्थी खूपच आनंदित होते .मुलांना फुगे,फुले,आणि गोड खाऊ देण्यात आला.त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. शाळेतल्या आणि नव्याने दाखल झालेल्या मुलांबरोबर पालकांचे खास आकर्षणाचे केंद्र ठरले. अनोख्या केलेल्या स्वागता मुळे चिमुरडे विद्यार्थी भारावले होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय बनसोडे, उपाध्यक्षा सौ.प्रणाली बनसोडे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री .धाईंजे सर सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टीम झुंजार