प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रावेर तहसील कार्यालयावर शेतकरी बैलगाडी जनआक्रोश मोर्चा.

Spread the love

रावेर प्रतिनिधी- उद्या दि 17 जून शुक्रवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रावेर तहसील कार्यालयावर शेतकरी बैलगाडी जनआक्रोश मोर्चा. यावल रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या केळी नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी या साठी व विविध मागण्या संदर्भात

प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात शेतकरी बैलगाडी जनआक्रोश मोर्चा..शेतकर्‍यांनी शेतमजूरांनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन अनिल भाऊ चौधरी यांनी केले

शेतकऱ्यांच्या हितासाठी व मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या
1) अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी
2) शासायनिक खातांच्या किंमती त्वरित कमी व्हावी
3) रात्रीची लोडशेडिंग बंद करून 10 तास सुरळीत विजपूरवठा मिळवा
4) केळी पीक विमाची रक्कम त्वरित मिळावी
5) जाळलेले रोहित्र कोणत्याही अटी शर्ती न ठेवता 24 तासाच्या आत त्वरित मिळावे

स्थळ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर, वेळ- दुपारी 12:00 वाजता, दिनांक- 17 शुक्रवार 2022

आवाहनकर्ते- प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधू पाटील, प्रहार जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन, प्रहार युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, योगेश पाटील रावेर तालुकाध्यक्ष पिंटू धांडे, महीला आघाडी तालुकाध्यक्ष वंदनाताई बावस्कर,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वसीम शेख, युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम, व समस्त प्रहार जनशक्ती पक्ष रावेर

शेतकर्‍यांनी शेतमजूरांनी आपल्या न्याय हक्कासाठी

टीम झुंजार