जळगावला हादरवून सोडणारी घटना ; गुंगीचं औषध देऊन तरुणीला २ लाखाला विकले

Spread the love

रावेर : – राज्याला हादरवून सोडणारी घटना जिल्ह्यातील रावेर तालुक्यात घडली आहे. येथे तरुणीला गुंगीचं औषध देऊन २ लाखाला विकण्यात आलं. इतकंच नाहीतर पीडित तरुणीचे जबरदस्तीने लग्न करून तिला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचाही प्रकार घडला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन अनोळखी महिलांनी २५ वर्षीय तरुणीला नाश्त्यामधून गुंगीचे औषध घालून बेशुद्ध केले. त्यानंतर लग्न करण्याच्या उद्देशाने दोन लाख रुपयाला विक्री करून पळवून नेले. यानंतर पीडितेच्या मनाविरुद्ध राकेश भगीरथ वर्मा याने पीडितेनेसोबत लग्न करून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडितेची सासू शामू भगीरथ वर्मा, सासरे भगीरथ वर्मा, दीर कमल भगीरथ वर्मा, दिनेश भगिरथ वर्मा व विवाहित ननंद तेजू यांनी पीडितेला संगनमताने डांबून ठेवून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून, रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

टीम झुंजार