प्रतिनिधी समाधान मगर
टिटवी ता पारोळा :-येथे आज दि.7 जानेवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.जागृती विनोद पाटील यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी व्ही एन राठोड यांनी काम पाहिले तर तलाठी एस व्ही वाघमारे ग्रामसेवक आर डी पाटील त्यांना सहकार्य केले.

याप्रसंगी उपसरपंच दगडू पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार किरण माळी सुनीता माळी कोकिळा सोनवणे मीनाबाई पाटील युवराज सोनवणे मानसिंग पवार सुदाम पवार गोविंद पवार प्रेम पवार महेंद्र खैरनार तसेच माजी सभापती विजय पाटील मा जि प सदस्य पांडुरंग पाटील माजी सरपंच पुंडलिक पाटील छोटू माळी सुधाकर माळी.विनोद पाटील उदय पाटील भाऊसाहेब पाटील रविंद्र पाटील कमलाकर पाटील संजय मगर सतीश पाटील सर अमोल पाटील सर लोमेश पाटील सोमनाथ माळी भरत पाटील निंबा पाटील गोरख पाटील मनोहर पाटील राजेंद्र पाटील भगवान पाटील समाधान मगर सतीश कोळी भरत विनायक पाटील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच जागृती पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या निवडीचे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय पाटील यांनी अभिनंदन केले.






