शिवसेनेच्या ढाण्या वाघ अशी ओळख असलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या गळाला. ; शिवसेनेचे अजून चार आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट गुवाहाटीला पोहोचले आहेत

Spread the love

राज्यात भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करावं अशी मागणी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी केले आहे.

गुवाहाटी – एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतर शिवसेनेचे ३ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी २ आमदार होते.

राज्यात भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करावं अशी मागणी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी केले आहे. त्यात आता गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे आमदार योगेश कदम, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे पोहचले आहेत. याठिकाणी गुलाबराव पाटील यांचे सर्व बंडखोर आमदारांनी त्यांचे स्वागत केले आहे. 

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

राज्यात शिवसेना-भाजपाने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फुट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपद का स्वीकारलं?

सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावलं. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणं असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

शिवसैनिकांना आवाहन

ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

टीम झुंजार