मुंबई : – शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं थेट आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, वर्षावर शिवसेनेनं बोलवलेल्या बैठकीला 17 आमदार उपस्थित होते. गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरु आहे. रोज कुणीतरी आमदार इकडून तिकडे गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे नेमके कोणते आणि किती आमदार कुणाबरोबर आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. 17 आमदारांच्या उपस्थितीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती आरोप केले.
“आज आपल्यासमोर शिवसेनेचे दोन आमदार आहेत. मराठवाड्यातले कैलास पाटील आणि विदर्भातले नितीन देशमुख आमच्याबरोबर आहेत. यातले एकजण सूरतहून आलेत तर दुसरे गुवाहाटीवरुन आले आहेत. इथे येताना त्यांना संघर्ष करावा लागला. ही संपूर्ण कहाणी थरारक आहे. शिवसेनेचा आमदारांना अपहरण आणि फसवून भाजपाने नेलं आहे. गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“तिथली स्थिती सांगण्यासाठी कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांना तुमच्या समोर आणलं आहे. देशातलं राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं हे दिसंतय. शिंदे गटातल्या 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी किती व्हिडीओ पाठवले तरी ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेनेचे असतील. या सर्वांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही विजयी होऊ.”, असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.