भुसावळ : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच भुसावळ शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंट रहिवासी व साकेगावातील मूळ रहिवासी असलेल्या अर्पणा सोपान पाटील (16) या दहावीतील विद्यार्थिनीने धान्यात टाकण्याचे औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
आई रागावल्याने अल्पवयीन तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंटमधील रहिवासी अर्पणा पाटील ही गुरूकूल शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती मात्र मंगळवारी आईने रागावल्यानंतर तिने धान्यात टाकाण्याची औषधाची पावडर पाण्यात मिसळून हे पाणी प्राशन केले व अत्यवस्थ अवस्थेत भुसावळातील डॉ.मानवतकर हॉस्पीटलला उपचारासाठी नेल्यानंतर मध्यरात्री 1.45 वाजता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू ओढवला.
मृत अर्पणाच्या मृतदेहावर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये बुधवारी सकाळी विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट पुढील तपास करीत आहे. मृत अर्पणा हिची आई डीआरएम कार्यालयात नोकरीला आहे तर वडील ठेकेदार आहे. दरम्यान, रुग्णालयात
जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी जावून माहिती घेतली. अर्पणा ही पाटील यांच्या नात्यात आहे.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.