गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

Spread the love

मुंबई : – शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून परिचीत असलेले महाविकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील शिंदे दाखल झाले आहे. शिंदे गटात शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांचा समावेश आहे. यामुळे महाविकास आघाडी कधीही कोसळू शकते. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत बंडाळी केलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर चांगलाच कडाडून हल्ला चढवला. हे गुलाबराव पाटील कसली भाषण ? जस काय शिवसेनेत कोणी वाघच नाही, पण ढुंगणाला पाय लावून पळून गेले. गुलाबराव पाटील आता परत पानटपरीवर बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.

“गुलाबराव पाटील आता परत पानटपरीवर बसतील. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही हा इतिहास आहे. संदिपान भुमरेंना तिकीट मिळाले तेव्हा ते साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. त्यानंतर ते मुंबईला आहे. त्यांना वडा सांबर खाता येत नव्हते. जमिनीवर बसून वडा सांबर खात होते आणि आज ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंकडे गेले. त्यानंतर माझ्याकडे आले. त्यावेळी ते शिवसेनेने मला मोठे केले असं म्हणत रडत होते. ते अश्रू खोटे होते ते आता कळले आहे. महाराष्ट्राचा आणि देशाचे बिग बॉस कोणी असतील तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. ज्यांना जायचे आहे त्यांना जावू द्या. प्रकाश सुर्वे भाजी विकत होते. आता परत त्यांना भाजी विकायला पाठवूया. प्रकास सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

आज दहिसरमध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकेक बंडखोर आमदारांची नावे घेत तुफानी हल्ला चढवला.मंत्री गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव तसेच त्यांच्या पत्नी यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे यांचा चांगलाच समाचार घेतला. अब्दुल सत्तारचं कसलं हिंदुत्व धोक्यात आलंय ? अशी विचारणाही त्यांनी केली

गुलाबराव पाटील पाटील यांच्यावर टीका करता संजय राऊत म्हणाले की, गुलाबराव पाटील टपरीवर पान विकायचे, त्यांना शिवसेनेने मोठे केले. मंत्री केले. भाषण तर असे झोडतात की मीच एकटा शिवसेनेमध्ये वाघ आहे. मात्र आता वेळी आली तर ढुं ….ला पाय लावून पळून गेले. मात्र मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. पुन्हा त्यांना टपरीवर पान विकायला लावेपर्यंत शांत बसणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे

गुवाहाटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील

“जर आपण महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर गुवाहाटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेमधील ही कीड कायमची संपून जाईल. त्यांना शिवसेनेने काय नाही दिले. अनेकांवर अन्याय करत त्यांना संधी दिली आहे. पण आता हे होणार नाही. असा अन्याय होईल तेव्हा आमच्यासारखे लोक उभी राहितील आणि सांगतील की हे होता कामा नये. हे लोक कुठून येतात आणि यांना कोण आणतं हे मला सगळं माहिती आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

टीम झुंजार