“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हे ट्विट करताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टॅग केलं आहे.
मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं खुद्द संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं. त्यानंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट केलं आहे. हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर’, असा निर्धार त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खासदार संजय राऊत यांना टॅग केलं आहे तसेच मी शिवसैनिक असा हॅशटॅगही वापरला आहे.
बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत. काल शिवसेना भवनात पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बंडखोर शिंदे गटाविषयी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे दोन मेळावे झाले. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर’, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू”
“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?, असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. तसेच यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल असल्याचं सांगत आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.