आनंदाची बातमी ; पुढच्या ३-४ तासांत जळगावसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा.

Spread the love

जळगाव :- सध्या राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच हवामान खात्याकडून पुढील ३ ते ४ तासांत जळगावसह परभणी, बीड, औरंगाबाद, नाशिक, धुळे (Jalgaon, parbhani,bid, aurangabad, Nashik, Dhule ) या ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील दिवसापासून पाऊस कोसळत आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाने हजेरी लावली नाहीय. जिल्ह्यात झालेल्या पावसाने पेरणीचे काम जोरात सुरु आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, अशातच जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत परभणी, बीड, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात याला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार