पारोळा तालुक्यातील रस्ते व पुलाच्या बांधकामच्या आमदार चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

झुंजार प्रतिनिधी:- समाधान मगर

पारोळा:-आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी सावरखेडे गावाजवळ लहान पुलाचे पोचमार्गासह बांधकाम करणेसाठी – २ कोटी १२ लक्ष ७९ हजार, म्हसवे ते नगांव रस्ता रूंदिकरणासह सुधारणा करणेसाठी – १ कोटी ८० लक्ष, सार्वे ते बाहुटे रस्ता डांबरीकरण करणेसाठी – १ कोटी ५६ लक्ष ९४ हजार, पारोळा ते चोरवड रस्ता सुधारणा करणेसाठी – २ कोटी १३ लक्ष ६१ हजार असे एकुण मतदारसंघातील रस्ते सुधारणेसाठी मंजुर ७ कोटी ६३ लक्ष ३४ हजार रूपये आणि बाहुटे गावासाठी विविध योजनेंतर्गत मंजुर २५ लक्ष रूपयांचा भव्य शुभारंभ आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, बाजार समिती संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, मधुकरआबा पाटील चोरवड सरपंच राकेश दादा पाटील यांसह सावरखेडे, नगांव, म्हसवे, बाहुटे, चोरवड, सार्वे, भोंडण, येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व बांधकाम विभागाचे अधिकारी, कंत्राकदार उपस्थित होते.

टीम झुंजार