मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे.
एकीकडे राज्यात शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमळे राज्यातील राजकारण तापले असतानाच राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीचा समावेश आहेत. त्यात रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6 यांचा समावेश आहेत.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम –
तहसिलदार यांनी विडणुकीचू नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 5 जुलै 2022 (मंगळवार ).
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत… वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक – 20 जुलै 2022.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक – 22 जुलै 2022.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर).
आवश्यक असल्यास मतदानाचा दिंनाक – 4 ऑगस्ट 2022.
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक – 5 ऑगस्ट 2022