पानटपरी चालक गुलाबराव पाटील कार्यकर्त्यांना चुना लाऊन पळून गेले.संपर्कप्रमुख संजय सावंत.
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-पाळधी सारख्या लहान गावात पानटपरी चालवणा-या मंत्री गुलाबराव पाटील याना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने सत्ता,पदे व प्रतिष्ठा मिळवून दिली,मात्र पानटपरी चालक गुलाबराव पाटील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चुना लाऊन पळून गेले अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यास तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यात पदाधिका-यांनी बंडखोर आमदारांवर अत्यंत शिवराळ भाषेत,अश्लील शब्द,बंडखोरांचे उत्तरकार्य,श्रद्धांजली यासारखे शब्द वापरून खालच्या स्तरावर टीका केली.शिवसेना कार्यालयापासून शिवसेना पदाधिका-यांनी बंडखोरांच्या निषेधार्थ आक्षेपार्ह घोषणा देऊन निषेध मोर्चा काढला.यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी आमदार चिमणराव पाटील यांनी पक्ष वाढविण्यापेक्षा वयक्तिक पक्ष संघटना उभारण्याचा प्रयत्न करून पक्षाचे खच्चीकरण केल्याचा आरोप केला.शिवसेनेच्या चिन्हावर आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकणा-या बंडखोरांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचे आव्हान त्यांनी दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने मराठी लोकांसाठी,महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी संपूर्ण आयुष्य घालवले असल्याचे सांगितले.राज्यात लाखो शिवसैनिकांना सन्मानाने उभे केले असल्याचे सांगितले.शिवसेनेला बाप म्हणणा-या बंडखोर आमदारांनी बाप का बदलला असा प्रश्न उपस्थित केला.जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने यांनी कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णांना मदत करत असतांना आमदार चिमणराव पाटील व त्याच्या मुलगा अमोल पाटील हे सुध्या घराच्या बाहेर पडले नाहीत असा आरोप केला.एरंडोल मतदार संघात शिवसेना एकसंघ असून आगामी काळात होणा-या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही दिली.जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असतांना आमदार चिमणराव पाटील कार्यकर्त्याना वा-यावर सोडून स्वस्वार्थासाठी पळून गेल्याचा आरोप केला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर , युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,संदीप पाटील,उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी बंडखोर आमदार व मंत्र्यांवर आक्रमक शैलीत टीका केली.मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले.विकास कामांचा निधी मंजूर करतांना दहा ते पंधरा टक्क्यांची मागणी केली जात असल्याचे जाहीरपणे सांगितले.बंडखोर आमदारांवर टीका करतांना पदाधिका-यांनी शिवराळ,अश्लील भाषेचा वापर केला.आमदारांचे आज उत्तरकार्य असून श्रद्धांजली सभा असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी यांनी बंडखोर आमदार मतदार संघात आल्यावर त्याच्या गाडीचे काच्या दगडाने फोडेन असे न केल्यास तर बापाचे नाव सांगणार नाही असे जाहीरपणे मेळाव्यात सांगितले.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोर आमदार विजयी झाल्यास आत्महत्या करेल अशी घोषणा केली.शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले.शहरप्रमुख कुणाल महाजन यांनी सूत्रसंचलन केले.
मेळाव्यास जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,महानगरप्रमुख शरद तायडे,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,राजा भेलासेकर,माजी सभापती मोहन सोनावणे,अनिल महाजन,दिलीप रोकडे,प्रमोद महाजन,गजानन महाजन,विवेक पाटील,नितीन बिर्ला,रमेश महाजन,सुरेश पवार,कुणाल पाटील,किशोर पाटील,हरीश पांडे,राजेंद्र महाजन,बापू धनगर,हेमंत पाटील,संतोष कोळी,सुनील मराठे,सुनील मराठे,गबाजी पाटील,डॉ.सतीश देवकर,नगरसेविका आरती महाजन,प्रतिभा पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शिवसेनेच्या कार्यालया पासून निषेध मोर्चास सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले या मोर्चात शिवसैनिक यांचे कडून शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है,बंडखोर आमदाराच्या निषेध आहे,अश्या घोषणा देण्यात येत होत्या.
शिवसेनेच्या एका गटा तर्फे बंडखोर आमदाराच्या पुतळा दहन करण्यात येणार होता परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या विरोधमुळे पुतळा दहनच्या कार्यक्रम रद्द करण्यात आला.