नवी दिल्ली : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच आधी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनणार असल्याची बाब उघड असतांना ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचे आलेले नाव…फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यास दिलेला नकार आणि श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यामुळे दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींनी फडणवीस यांचा गेम केल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. यातून त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
राज्याच्या राजकारणातील आजचा दिवस हा अनेक धक्क्यांनी गाजला. फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे समीकरण अस्तित्वात येईल असे सर्वांना वाटत होते. अगदी हे दोन्ही मान्यवर राज्यपालांना भेटले तेव्हा देखील असेच वाटत होते. मात्र राज्यपालांना भेटून आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिं नाव जाहीर केल्याने सर्वांना धक्का बसली.तर, याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
यानंतर सुमारे एका तासाने भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेचा मोह नसून याचमुळे आम्ही शिंदे यांना पाठींबा दिला फडणवीस यांनी मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे जाहीर केले नसले तरी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर ट्विट करून त्यांनी फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे द्विट केले.
प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे. https://t.co/uBp4yBsU5D
यामुळे फडणवीस यांचा गेम मोदी, शाह यांनी केल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांची राजकीय उंची कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.