जळगाव, (प्रतिनिधी) : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस(Devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी यांनी देखील नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या खरं पण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे की,देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगले काम त्यांनी या ठिकाणी करावे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता यांनी करावी. घडलेले नाट्य हे अनअपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा पूर्ण झाले नाही, परिस्थितीनुसार त्यांनी स्वीकारले, असे एकनाथ खडसे म्हणाले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक
माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,अनेक आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात २.५ वर्षात मा. उद्धवजी व मा. अजितदादांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणकारी सरकार राज्याला दिले. कोविड काळात सरकारच्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. संयमी व संवेदनशील नेतृत्वामुळे हे सरकार जनतेच्या मनात राहील.
हे वाचलंत का ?
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.