लोणार येथे बंजारा समाजाकडून वसंतराव नाईक यांची जयंती साजरी….

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार शहरात बंजारा समाजाची दैवत,सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते,बंजारा समाजाचे भूषण वसंतराव नाईक साहेबांची जयंती मोठ्या उत्सवात लोणार येथे साजरी करण्यात आली,वसंतराव नाईक यांची शोभायात्रा काढण्यात आली महिलांनी व पुरुषांनी पारंपारिक वेशभूषित लफड्याच्या तालावर पारंपारिक नृत्य सादर करत लोणार शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्राचे वेळी अभय दादा चव्हाण,विठ्ठल चव्हाण,गुलाब राठोड,जंगलसिंग राठोड,बाबूसिंग जाधव सर,भारत राठोड,रोहिदास जाधव,प्रकाश चव्हाण,विष्णू राठोड,भारत राठोड,आकाश राठोड,अरूण चव्हाण,डॉ.संतोष आडे, कृष्णा राठोड यांच्या सह समाज बांधव,महिला मंडळ,पारंपरिक बंजारा वेश भुषेत मिरवणूक काढण्यात आली त्या वेळेस खूप मोठया प्रमाणात समाज बांधव व तरुण उपस्थित होते…

टीम झुंजार