जळगाव – जळगाव ते विदेश फूड बूथ ने समाजसेवेची छाप देणाऱ्या सामाजिक उवक्रमची उद्यापासून सुरुवात..!

Spread the love

3 जुले रोजी उदघाटन सोहळा..

धीरज जावळे सर हे एका लग्नसोहळा साठी गेले होते . लग्नसमारंभ मध्ये बरेच अन्न फेकले गेले तेथे हे जेवण वाया जात असल्याने त्यांना युक्ती सुचली .या अन्न चा आपण यथायोग्य नियो केल्यास गरिबांची भूक शमवू शकते या उद्देशाने फूड बँक ची सुरूवात केली.

जावळे कुटुंबातील व मित्रपरिवार यांच्या अहोरात्र व निस्वार्थी विचाराने चार वर्षांपासून सतत दररोज अखंडित पणे फूड बँक अन्नदान करत असून हे पवित्र कार्य अखंडपणे सुरू आहे

फूड बँकचा विदेशात देखील समाजकार्य चा डंका…

जळगाव च्या फूड बँक च्या कार्याची दखल लंडन येथील लोकांनी ही घेतली व फूड बँक ला जेवन वाटप च्या कार्यात सहभागी नोंदविला यात प्रमुख्याने नवीन चॉकसे, वंशिका शृंगाराम , ललिता अय्यागिरी हे डोनर परदेशातुन ही फूड बँक च्या अन्नदान कार्यात मदत करतात.

निस्वार्थ च्या फूड बूथ ला सुरुवातीस एक महिन्याचे जेवण श्री अविनाश किसनलाल शिलहार सर ( एरंडोल) यांच्याकडून देण्यात आले.

यांचे असते नेहमी सहकार्य –

फूड बँक च्या कार्यात प्रामुख्याने
श्रीराम पाटील, सुनील बाफना,रिषभ बाफना, अभिषेक बाफना, सुनील कुराडे, राहुल भाऊ सोनवणे, जितेंद्र भंगाळे, केदार थेपडे, सुषमा थेपडे,हर्षदा पाटील, प्रणेश ठाकूर, नवीन चोकसे (लंडन) , सुषमा कांची, रामकीशन वर्मा,स्वाती अहिरराव,रुपाली वाघ, कांचन साने.

फूड बँक व सेवेसाठी तत्परतेने कार्य करणारी टीम-

फूड बँक टिम धीरज जावळे, सुलतान पटेल,नकुल सोनवणे, बब्बू भैया जावळे, गणेश देसले,पूनम भाटिया,शारदा सोनवणे,सतीश जावळे, धनंजय सोनवणे व संस्थापक अध्यक्ष अविनाश जावळे.

निस्वार्थ च्या या आगळ्या वेगळ्या व धडपड मधुन अनेकांना आज अन्न ग्रहण साठी सुविधा उपलब्ध करुन आदर्श निर्माण केला आहे. कोरोना महामारीत फूड बँक थांबली नाही दररोज 800 लोकांना गोदावरी हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, व रस्त्यावरील लोकांना जेवण वाटप चे कार्य सुरू होते , यात पोलीस प्रशासन व जळगाव जिल्हा न्यायाधीश संघ ची विशेष सहकार्य लाभले होते. 3 जुले रोजी होणाऱ्या नवं सुरुवातीला अनेकांचा शुभेच्छा वर्षाव होत असुन कौतुक व्यक्त होत आहे.

टीम झुंजार