गावठी पिस्तूल, काडतूस बाळगून दहशत पसरवणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरवणाऱ्याचि संख्या वाढत चालली आहे अश्यातच जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवत फिरणाऱ्या तरूणास रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल, काडतूस जप्त केले आहे. प्रवीण विनोद शिंदे (वय 21, रा. धनगरवाडा, हरिविठ्ठलनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात एक तरूण विनापरवाना गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून दहशत माजवत फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाळे, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, जितेंद्र तावडे, सागर देवरे, महिला पोलिस कर्मचारी स्वाती बागे, रवींद्र चौधरी यांच्या पथकाने रात्रीच हरिविठ्ठलनगरात गस्त केली.

गुन्हा दाखल

यावेळी प्रवीण शिंदे हा संशयितपणे फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. यानंतर त्याने एक पिस्तुल व काडतूस काढून दिले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. या प्रकरणी रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन प्रवीणच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सपकाळे तपास करीत आहेत. रविवारी प्रवीणला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार