लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- लोणार तालुक्यातील सरस्वती येथे नुकत्याच PSI पदी नवनियुक्त झालेल्या मनिषा जाधव यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला.
लोणार तालुक्यातील सरस्वती येथील कष्टकरी कुटूंबातील भागवत भाऊराव जाधव यांची कन्या सौ मनिषा अनिल भागडे यांची नागपूरला उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी PSI मनीषा जाधव यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
गावातील युवकांना व युवतींना एक नवीन आदर्श म्हणून मनीषा जाधव यांच्याकडे पाहिले जाते तसेच इतरांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षणाला महत्त्व देत स्वकृत्ववातून काहीतरी बनण्याचा प्रयत्न करावा, यासाठी गावकऱ्यांनी सत्कार केला व गावातील इतरांनी मनीषा जाधव यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या सोबतच आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे यासाठी गावकऱ्यांनी पेढे वाटून,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी माधव जाधव ,गणेश इंगोले,ज्ञानू कडाळे,गणेश भाकडे ,अंकुश तिजोरे,विनोद जाधव,सतीश सरकटे,प्रभु जाधव,अनिल भाकडे,विजय जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






