12 खासदार व 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार ; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच राज्यात गेल्या १५ दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. गेल्या अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे पायउतार व्हावं लागलं. दरम्यान, एकनाथ शिंदे गटात गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील हे जळगावात पोहोचले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान, यावेळी बोलताना आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या समर्थकांना बोलून दाखवलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अजूनही सावध रहावं असा सल्ला देखील त्यांनी ठाकरेंना दिला.

गुलाबराव पाटलांचा जळगावमध्ये गौप्यस्फोट
शिंदे सरकार स्थापनेनंतर माजी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथमच जळगावमध्ये आले. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार