झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर )श्री वर्धमान विद्यालयाने बालगोपाळांसाठी पालखी सोहळ्याचे आयोजन केले. मागील दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून दिंडीमध्ये सहभागी झाले.विठू नामाच्या गजरात व ज्ञानोबामाऊली – तुकाराम या नामस्मरणात सर्व विद्यार्थी भक्तिभावाने रंगून गेले.
या प्रतीकात्मक पालखीचा पहिला विसावा बाजारपेठ येथे झाला. बाजारपेठेतील खोमणे कुटुंबीयांनी विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली. येथेच गोल रिंगण पार पडले. विद्यार्थ्यांनी फुगडी, बेडूक उड्या मारून पालखीस प्रदक्षिणा घातली.श्रावणी निंबाळकर हिने गोड आवाजात अभंग गायन केले. पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पाहण्यासाठी वालचंदनगर मधील नागरिक उपस्थित होते.
अनेक पालक व नागरिकांनी या पालखी सोहळ्याचे कौतुक केले. विद्यालयाचे शिक्षक सुरज मोरे यांनी विद्यार्थ्यांना गोल रिंगणासाठी मार्गदर्शन केले तर लक्ष्मी सरगर यांनी पालखी सोहळ्याची महती व परंपरा याविषयी माहिती दिली वारकऱ्यांप्रमाणे स्वयंशिस्तीचा गुण अंगीकारा असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.

शिवप्रसाद कुलकर्णी,सुचिरता पडतुरे व देवराम प्रधान यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले. या पालखी सोहळ्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, पर्यवेक्षक माणिक पिसे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






